मुंबई : सायन कोळीवाडा येथे सालाबाद प्रमाणे यंदा ही नवीन संकल्पना ( ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह )या विषयावर होळीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गेल्या काही वर्षा पासून रस्त्यावरील अपघात वाढत चाले आहेत आणि त्याचे जास्त जास्त हे अपघात मद्यपान करून वाहन चालवून झाले आहेत. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाले आहे.
या विषयावर ही प्रतिकृती आशीष विठ्ठल कुचेकर अमर विठ्ठल कुचेकर या बंधू नी साकारले आहे. ही प्रतिकृती 12 फूट उंच असून टाकाऊ लाकूड ,वर्तमान पत्र टाकाऊ स्पंच या पासून बनवण्यात आली आहे. यातून चला संकल्प करूया drink and drive ची होळी करूया असा संदेश देण्यात आला आहे.
