स्थानिक गावकऱ्यांच्या आरोग्यावर धोक्याची शक्यता
वर्धा : वर्धा, अमरावतीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पोकलेन व जेसीबीसारख्या जड यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या यांत्रिक उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून नदीपात्र, भूजलस्तर आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहेत.
वर्धा जिल्ह्यातील बहुतांश रेती घाटांवरून रात्र पाळीत पोकलेन आणि जेसीबीच्या साह्याने अवैध रित्या रेती उत्खनन केले जात आहे. नातवाचे म्हणजे चोर मार्गाने यापूर्वीच लाखो ब्रास रेती उत्खनन झाली होती. त्यानंतर घाटांचा लिलाव झाल्यानंतरही क्षमतेपेक्षा लाखो ब्रास रेतीचे उत्खनन सुरू आहे. रात्र पाळीतील रेती उत्खनन कुठल्याच कायद्यात बसत नाही. मात्र नियम धाब्यावर बसऊन राजकीय रेती माफिया चोरी करत आहे.
महत्वाच म्हणजे महसूल मंत्री विदर्भाचे असून त्यांच्याच आदेशाची पायमल्ली होत आहे. हिंगणघाट तालुक्यात सोनगाव समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव या घाटांवर रेती माफियांवर आमदार समीर कुणावर यांचा वरदहस्त असल्याच सांगितल जातंय. त्यामुळे महसूल अधिकारी रेती घाटांकडे फिरकत सुद्धा नाही.
नदीत जेसीबी आणि पोकलेन मूळे स्थानिक गावांमध्ये आजारांचे प्रमाण वाढले आहे. नदीपात्रात पोकलेन व जेसीबीसारखी जड यंत्रे वापरली जातात तेव्हा डिझेल, इंजिन ऑइल किंवा ग्रीस गळती होण्याची शक्यता असते. हे इंधन पाण्यात मिसळल्यास पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता बिघडते आणि विविध आजारांचा धोका वाढतो.
स्थानिक गवाकऱ्यांमध्ये त्वचारोग
स्थानिक गवाकऱ्यांमध्ये त्वचेवर खाज, पुरळ, लालसरपण जाणवायला लागल्या आहेत. त्याचबरोबर पोटाचे विकारही वाढले आहेत. नागरिकांमध्ये उलटी, जुलाब, पोटदुखी गॅस्ट्रायटिस आणि दूषित पाणी पिल्यास पचनसंस्था बिघडली आहे.
डिझेल वाफेमुळे खोकला, घसा जळजळ दम्याचा त्रास वाढू शकतो. तर त्याचे दीर्घकालीन परिणामीही दिसायला लागले आहेत. जसे यकृत (लिव्हर) व मूत्रपिंडांवर ताण, काही घटक कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.
क्रमश…!
